शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (16:07 IST)

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ

Independent Census
ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी ही मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिलं आहे. समर्थन देताना देवेंद्र फडणवीस यांनी योगायोगाने देशाचे पंतप्रधानदेखील ओबीसी असल्याचं सांगितलं.
 
जनगणनेच्या अर्जात बदल केले जावेत अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते असंही यावेळी त्यांनी सांगितलं. यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.