शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (16:35 IST)

भुजबळ अचानक रुग्णालयात दाखल, उपचार सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने सकाळी त्यांना मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मात्र भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 
 
निवडणूक प्रचारात भुजबळांच्या प्रकृतीवर धावपळीचा वाईट परिणाम झाला. भुजबळ यांना गेल्या ३-४ दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. सकाळी नियमित तपासणी करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यानंतर रक्तदाब वाढल्याचे लक्षात आल्यानंतर भुजबळांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 
 
सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण बैठकीला त्यांनी आजारी असतानाच हजेरी लावली होती असेही समजते.