शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2017 (12:15 IST)

माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद

माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन केले आहे. यामुळे पर्यटकांसाठी माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी व रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे.  

सध्या परिसरात दरडींचा अंदाज घेणे सुरू आहे. दरम्यान वाहतुकीवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याचा धोका जाणवत असल्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते आहे.