शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जून 2024 (09:38 IST)

हॉटेल ताज आणि विमानतळ उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

arrest
हॉटेल ताज आणि विमानतळाला उडवून देण्याची धमकीचा संदेश देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल देखील जप्त केला आहे. 

आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. त्याने धमकी का दिली हे अद्याप समजू शकले नाही. 
सोमवार 27 मे रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबई ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा फोन आला असून या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचे सांगण्यात आले होते.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जागेच्या शोध घेतल्यावर त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिसांना या फोन करणाऱ्या व्यक्तीच्या शोध घेत होती. अखेर त्या आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली.
 
अलीकडील काही काळापासून दिल्ली, बंगळुरू, जयपूर, लखनौ, अहमदाबाद, गोवा, नागपूर, कोलकाता  या शहरात शाळा,विमानतळ आणि रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी चे मेल येत होते.  

 Edited by - Priya Dixit