शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (18:56 IST)

पैशासाठी काहीपण; 15 लाखासाठी पती जिवंत असताना मृत दाखवले, महिलेला अटक

असं म्हणतात की पैशांसाठी लोक काहीही करू शकतात ह्याच उदाहरण म्हणजे एका महिलेने 15 लाख रुपयांसाठी आपल्या जिवंत पतीला मृत दाखवले आणि एलआयसीची फसवणूक करून पैसे घेतले.पैश्यांची गरज असल्यामुळे तिने हा सगळा कट रचला.या प्रकरणात महिलेची फसवणूक केल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. 
 
ही घटना 4 एप्रिल 2021 रोजीची आहे. महिला बिहारच्या गया येथे वास्तव्यास असून भाड्याच्या घरात राहत होत्या. 2021 मध्ये तात्कालीन शाखाप्रमुख सुरेश सैनी यांनी फसवणूक केल्याची तक्रार केली असून सैबी देवी असे या महिलेचे नाव आहे. तिने तिचे पती सुनील कुमार यांचे निधन झाले असून एलआयसी कडून पतीने घेतलेल्या पॉलिसीचे पैसे घेतले. महिलेच्या पतीने एलआयसीची पॉलिसी 2016 मध्ये घेतली होती. ही पॉलिसी डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार होती. या पॉलिसीत नॉमिनी म्हणून सैबी देवीचं नाव होत.  
 
पैशांची गरज म्हणून या महिलेने एलआयसी एजन्टच्या मदतीने पतीला मृत घोषित करून मृत्यू प्रमाणपत्र दाखवून पॉलिसीवर दावा केला तिने या साठी लागणारे सर्व बनावटी कागदपत्रे जमा केली. पॉलिसी मध्ये नॉमिनी म्हणून महिलेचे नाव असल्यामुळे2020 मध्ये तिच्या खात्यात 15 लाख रुपये जमा केले. नंतर या प्रकरणात महिलेने एलआयसीची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यामुळे महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात महिलेची साथ देणाऱ्या एलआयसी एजेंटला अटक करण्यात आली आहे. 

महिला गेल्या अडीच वर्षांपासून फरार होती. हे प्रकरण उघडकीस आल्यावर महिलेला अटक करण्यात आली असून महिलेने सर्व रक्कम पुन्हा एलआयसीला परत दिली. 
 



Edited by - Priya Dixit