शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (16:11 IST)

भयंकर, पुण्यात तरुणीला जवळ ओढून केले किस

पुण्यात एका इंजिनिअरिंगच्या तरुणीला जवळ ओढून किस करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. शहरातील जे एम रोडवर सदरची घटना घडली आहे. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
या घटनेत पीडित तरुणी लष्कर परिसरातील जे एम रोडवरुन जात होती. एका मित्राला पत्ता विचारण्यासाठी तिने मोबाईलवरुन कॉल केला. मात्र बॅटरी डाऊन झाल्यामुळे तिचा फोन बंद झाला. यामुळे तिने रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीची मदत मागत, त्याच्या फोनवरुन मित्राला कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. आरोपीने मोबाईल दिल्यावर, तिने मित्राला कॉल करुन पत्ता विचारला. यानंतर तरुणीने त्याचा मोबाईल परत केल्यावर, धन्यवाद दिले. मात्र आरोपीने तिचा हात पकडून तिला जवळ ओढून जबरदस्तीने किस केलं.