रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (08:40 IST)

मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि लावणी सम्राज्ञी मंगलाताई बनसोडे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या चित्रपट सांस्कृतिक विभागात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे दोन्ही कलावंत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
 
मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी पुण्यात राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. तमाशा कलावंतांसाठी हे दोन्ही कलाकार नेहमी कार्यरत असतात. राष्ट्रवादी संस्कृतीच्या माध्यमातून कलाकारांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते दोघेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती बाबासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. दरम्यान, रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे यांनी प्राथमिक स्वरूपात राष्ट्रवादीत प्रवेश केला.