गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 30 डिसेंबर 2023 (12:06 IST)

जालन्यात मनोज जरांगे पाटील लेझीम खेळण्यात दंग

manoj jarange patil
मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनोज जरांगे हे लेझीम खेळताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये जरांगे पाटील हे ढोल ताशाच्या तालावर लेझीम खेळात आहे. या पूर्वी त्यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

आज जरांगे यांचा ढोल-ताशा -हलगीच्या तालावर अचूक ठेका देत लेझीम खेळण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विचारात पडले आहे की हे राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी अल्टिमेटम देणारे जरांगे पाटीलच आहे का? जालन्यात ते लेझीम खेळताना दिसत आहे. 

जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी घेत उपोषण सुरु आहे. येत्या 20 जानेवारी पासून ते मुंबईत पुन्हा आंदोलन करणार आहे.  

Edited By- Priya DIxit