रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023 (07:49 IST)

मनोज जरांगे पाटील कल्याण दौर्‍यावर

Manoj Jarange
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील येत्या सोमवारी कल्याणमध्ये येणार आहेत. मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांची कोळसेवाडी भागात पोटे मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
 
मराठा क्रांती मोर्चाच्या कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांना कल्याणमध्ये आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांकडून सुरू होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करण्याचे जाहीर केले आहे. या दौ-याचा भाग म्हणून जरांगे पाटील कल्याणमध्ये येणार आहेत, असे पदाधिका-यांनी सांगितले.
 
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील पोटे मैदानावर संध्याकाळी सहा वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील मराठा समाजाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थिती लावणार आहेत. या सभेच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी सभेच्या यशस्वितेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.