शनिवार, 1 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (08:16 IST)

चाळीसगावात मनोज जरांगे-पाटील यांची 3 डिसेंबरला विराट जाहीर सभा

manoj jarange
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे महाराष्ट्रभर मराठा समाजाशी सभेतून संवाद साधत आहेत. त्याच अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यातील जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यास सुरुवात होणार आहे. चाळीसगाव शहरातील नारायणदास अग्रवाल क्रीडा संकुल मोठ्या कॉलेजचे ट्रॅक ग्राउंड, करगाव रोड येथे मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी, ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता विराट सभा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
 
विराट सभेला चाळीसगाव शहरासह तालुक्यातील तसेच भडगाव , पाचोरा, पारोळा, नांदगाव, कन्नड, येवला तालुक्यासह परिसरातील मराठा बांधव, भगिनी मराठा समाजाच्या विविध संघटना, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने केले आहे.