सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (08:38 IST)

खणीमध्ये पडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यु; भडगाव येथील घटना

गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव गावातून दुर्दैवी बातमी समोर येत असून एका जुन्या दगडाच्या खाणीमध्ये पडून मायलेकांचा मृत्यु झाला आहे. या घटनेने गडहिंग्लज तालुक्यात शोककऴा पसरली आहे.
 
भडगाव गावाजवळ असणाऱ्या क्रशरच्या जून्या खणीमध्ये पाणी साठल्याने तलाव सदृश्य परिस्थिती आहे. हि खाण खोलगट असल्याने पाण्याची पातळीही खोल आहे. या पाण्यामध्ये सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय ३२) आणि तिचा मुलगा मल्लिकार्जुन सिद्धाप्पा पाटील (वय१०) यांचा बुडून मृत्यु झाला आहे. या घटनेची माहीती मिळताच गावकऱ्यांनी तलावाजवळ एकच गर्दी केली होती. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन पिटाळून लावणारा होता. गडहिंग्लज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील पंचनामा सुरु आहे.





Edited By - Ratnadeep Ranshoor