गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (08:29 IST)

कोल्हापूर : भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी

death
कोल्हापूर किणे (ता.आजरा) येथे पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये सौ.सुनीता अर्जुन गुडूळकर (वय- ४५) ही महिला दबली जाऊन जखमी झाली होती. तिला उपचाराकरता नेसरी येथे हलवत असताना वाटेतच मृत्यू झाला.या दुर्घटनेत सौ.सुनीता यांचे पती अर्जुन गुडूळकर व वत्सला परसु गुडुळकर दोघे जखमी झाले आहेत. सदर घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
 
गुडूळकर कुटुंबीय हे येथील प्राथमिक शाळेसमोरील घरामध्ये राहतात.सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सौ.सुनीता या गोठ्यामध्ये गेल्या असताना अचानकपणे मातीची भिंत कोसळली.सदर भिंत चिऱ्याच्या भिंतीवर कोसळून चिऱ्याची भिंत देखील कोसळली.चिऱ्याखाली सौ.सुनीता या दबल्या गेल्या व गंभीर जखमी झाल्या.

उपचाराकरीता त्यांना नेसरी येथे हलवत असताना त्यांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेत पती अर्जुन गुडूळकर व सौ.वत्सला परसु गुडुळकर हे देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर किणे पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.तहसीलदार समीर माने,निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

Edited By - Ratnadeep ranshoor