शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 20 ऑगस्ट 2023 (15:44 IST)

Malshej : काळू धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू

Malshej : सध्या सर्वत्र पावसाळा सुरु आहे. या हंगामात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पाण्याच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखतात. या हंगामात धरण्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. अशा ठिकाणी पाय निसटून अपघात होऊन काही उत्साही लोक मृत्युमुखी होतात. 

असाच प्रकार माळशेज घाटातील काळू धबधब्यात घडला आहे. या धबधब्यात पडून एका तरुणाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक रावलकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह एका आठवड्यानंतर सापडला आहे. 

हा तरुण हैद्राबादचा राहणारा असून आपल्या 3 मित्रांसह मुरबाड तालुक्यातील थितबी गावातून काळू धबधब्यात वर्षाविहारचा आनंद घेण्यासाठी गेला असताना तोल जाऊन काळू नदीत जाऊन पडला आणि पाण्याच्या वाहत्या प्रवाहात वाहून गेला. या नदीला खोल डोह असल्यामुळे तो डोहात गेला. 

अपघाताची माहिती मिळतातच जुन्नर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अभिषेकचा शोध घेतला. मात्र अंधारामुळे रेस्क्यू टीमला शोध मोहीम थांबवावी लागली. नंतर गेले सहा दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता मात्र रेस्क्यू टीमला अपयश मिळाला. नंतर रायगड रेस्क्यू टीमने शोधल्यावर आठवड्यांनंतर अभिषेकच्या मृतदेह सापडला. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. सध्या हा धबधबा प्रशासनाकडून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit