शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (13:55 IST)

माळशेज घाट का प्रसिद्ध आहे ? तो सध्या बंद का आहे, जाणून घ्या खरे कारण ?

हिरवा शालू नेसून नटलेल्या डोंगरदऱ्या, उंच पर्वत रांगा, धुक्यामध्ये लपेटून गेलेले मेघराज, मुक्तपणे खेळाळणारे शुभ्र धबधबे या सर्व निसर्गाच्या वरदानाने संपन्न असलेल्या सौंदर्याला डोळ्यांमध्ये साठवायचे असेल, तर एकदा तरी माळशेज घाट पहायलाच हवा. आम्ही आमच्या माळशेज घाट या लेखातून आपणास माळशेज घाटाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा.
 
घाट परिसरात कलम 144 सुद्धा लागू करण्यात आला आहे
पावसाळा सुरु झाल्यानंतर काही ठराविक ठिकाणांना भेट देण्याची जणू परंपराच आहे. अशाच काही ठिकाणांमध्ये अनेकांच्याच पसंतीची जागा म्हणजे माळशेज घाट. मुंबईपासून जवळ आणि नगर कल्याण महामार्गावर येणाऱ्या या माळशेज घाटाची वाट, खोल दरी, त्यातच अडकलेले ढग आणि घाटमाध्यावरून कोसळणारे धबधबे असं एकंदर चित्र इथं दरवर्षी पाहायला मिळतं. जे पाहण्यासाठी इथं येणाऱ्या पर्यटकांचा आकडाही मोठा. पण, यंदाच्या वर्षी मात्र हे चित्र काही अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
 
एरव्ही घाटवाटेत येणाऱ्या लहानमोठ्या धबधब्यांपाशी थांबून त्यात भिजण्याचा आणि वाटेतच आलेल्या मुसळधार पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इथं हजेरी लावतात. यंदा मात्र हा आकडा मोठ्या फरकानं कमी झाला आहे. माळशेज परिसरात दरडींचा धोका पाहता इथं पर्यटकांना धबधब्यांच्या परिसरात थांबण्याची आणि गर्दी करण्याची परवानही नाही.
 
घाट परिसरात कलम 144 सुद्धा लागू करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत पाचजणांपेक्षा अधिक व्यक्ती इथं एकत्र येऊ शकत नाहीत. परिणामी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले हे आदेश पाहता आता पर्यटकही कोणताही धोका पत्करताना दिसत नाहीयेत. ज्यामुळं पावसानं चांगलाच जोर धरलेला असताना कधीकाळी पर्यटकांनी फुलणाऱ्या माळशेजमध्ये आता शुकशुकाट जाणवत आहे.
 
स्थानिक रोजगारांवर गदा
माळशेज परिसरामध्ये घाटरस्ता सुरु होण्याआधीच मोरबे धरण - मुरबाड मार्गावर अनेक आदिवासी पाड्यांमधील मंडळी रानभाज्या, फळं आणि काही पदार्थ विक्रीसाठी घेऊन येतात. तर, काही मंडळी घाटांमध्ये सुरक्षित वळणं बघून तिथं कणिस, मॅगी, भजी, चहा असे पदार्थ विकताना दिसतात. कोसळणारा पाऊस, वाफाळत्या भुईमुगाच्या शेंगा, भजी आणि चहा या अशा पदार्थांची जोड या पावसालाही वेगळंच रुप देते. पण, सध्या मात्र स्थानिकांच्या या रोजगारावर गदा आली आहे.
 
माळशेज घाट माहिती :
नभाला गवसणी घालणारे उत्तुंग असे महाकाय कडे, त्या कड्यांवरून कोसळणारे धबधबे, मुसळधार पाऊस, हळुवारपणे पुढे पुढे सरकणारे दाट ढग, आजूबाजूला असणारा निसर्गरम्य व विहंगम दृश्य देणारा माळशेज घाट. घाटातून वळणावळणाने जाणारा रस्ता, वाटेत लागणारे छोटे छोटे बोगदे, कड्यावरून धो धो कोसळणारे पावसाचे पाणी आणि त्यामुळे तयार झालेले फेसाळते जलप्रपात, डाव्या कुशीला असलेले टेकडी खालची छोटी छोटी टुमदार कौलारू घरे हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला आपण एका वेगळ्याच जगात आल्याचा भास होतो.
 
माळशेज घाट कुठे आहे ? (Where Is Malshej Ghat ?) –
या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. मुंबई ते अहमदनगर व नाशिक यांच्यामधील महत्त्वपुर्ण आणि प्रेक्षणीय असा घाटरस्ता असलेले स्थळ. या ठिकाणी तुम्ही स्वत:ची गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून निसर्गाचा आनंद घेउ शकता.
 
माळशेज घाट माहिती 
स्थान पुणे जिल्हा
घाट माळशेज
घाटाची लांबी पुण्यापासून साधारणतः १३० किलोमीटर
जवळील प्रेक्षणीय स्थळे हरिश्चंद्रगड ,व्ह्यू पॉईंट, धबधबे.
 
माळशेज घाट हवामान  –
या घाटाचे स्थान पश्चिम घाट डोंगररांगांत असल्याने इथे भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यानंतर हिवाळ्यात इथे तापमान ११ अंश ते २७ अंश इतके असते. उन्हाळ्यात मात्र या ठिकाणचे तपमान सरासरी ४० अंश ओलांडू शकते. हिवाळा हंगाम (डिसेंबर ते फेब्रुवारी) देखील भेट देण्यासाठी एक उत्तम वेळ आहे.
 
उन्हाळा – उन्हाळ्यामध्ये माळशेज घाटाचे हवामान हे साधारणतः ४0 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत असते.
 
पावसाळा- पावसाळ्यामध्ये माळशेज घाट अतिशय आल्हाददायक व विलोभनीय असून या ठिकाणी हवामान हे थंड व तजेलदार असते. वार्षिक पर्जन्यमान हे साधारणतः ६४९९ मिलिमीटर एवढे असते.
 
हिवाळा – हिवाळ्याच्या काळात माळशेज घाटाचे हवामान हे रात्रीच्या वेळी कमी असून साधारणतः ११ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. परंतु सकाळच्या वेळी घाटाचे हवामान हे साधारणतः २७ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते.
 
माळशेज घाट आणि पावसाळा-
वसाळ्याच्या समृद्ध वातावरणामुळे हा घाट अतिशय सुंदर व विहंगम दृश्य यांनी खुलून निघतो. तुम्ही देखील या कालावधीमध्ये ताम्हिणी घाटाची मजा व सुखद अनुभव घेऊ शकता. पावसाळ्यातील गर्द हिरवळ, धुक्यातील डोंगर, आणि धबधबे. या ठिकाणी तुम्ही स्वत:ची गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून निसर्गाचा आनंद घेउ शकता. समोरच हरिश्चंद्रगडाची डोंगररांग तुम्हास याच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसी आहे.
 
माळशेज घाट का प्रसिद्ध आहे?
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये वसलेला माळशेज घाट हा एक सुंदर लोकप्रिय घाट असून, एक उत्तम हिल स्टेशन आहे. या ठिकाणी असणारे धबधबे, पर्वत, हिरवेगार नैसर्गिक वातावरण, विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी, प्राणी या सगळ्यांचे एकत्रीकरण म्हणजे माळशेज घाट.
 
माळशेज घाट हा त्याला लाभलेल्या विविध नैसर्गिक संपत्तीने जसा संपन्न आहे, त्याचप्रमाणे माळशेज घाट मधील साहसी गोष्टींसाठी सुद्धा पर्यटक आकर्षित होतात. जसे की गिर्यारोह, ट्रेकिंग हे निसर्ग प्रेमींमध्ये एक कुतूहलाचा विषय आहे. शहरी गजबजीपासून थोडं दूर राहून, शांततेचा अनुभव घेण्यासाठी माळशेज घाट हे एक विकेंडला जाण्यासाठी उत्तम व आदर्श ठिकाण आहे.
 
गुलाबी रंगाने सुंदर दिसणारे फ्लेमिंगो पक्षी परदेशी पक्षी आहेत.व हे पक्षी हंगामी काळामध्ये अर्थात जुलै ते सप्टेंबर मध्ये माळशेज घाट जवळील पिंपळगाव जोगा धरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. माळशेज घाट जवळील असणारे उंच किल्ले, छोटे-मोठे धबधबे, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, ट्रेकर्स प्रेमींसाठी असणारा हरिश्चंद्रगडचा ट्रेक, आजोबा हिलचा ट्रेक लोकप्रिय आहे.
 
यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने माळशेज घाट एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते.
मुंबई मार्गे मुरबाड पर्यंत आल्यानंतर, तिथून जवळपास ४५ किलोमीटरवर माळशेज घाट लागतो. त्याचप्रमाणे आपण जर पुण्यावरून गेलो तर नारायणगाव – जुन्नर कडून माळशेज घाटात जाता येते. मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी माळशेज घाट हे परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन आहे. या पर्यटन स्थळावर उंच उंच धबधबे, घाट, हिरवेगार डोंगर त्यासोबतच सोळाव्या शतकातील स्थापत्यशास्त्रातील अद्वितीय अशी मंदिरे आणि किल्ले आहेत.
 
घाट उतरताना एक छोटेसे पठार लागतं या पठारावर महाराष्ट्र पर्यटन खात्याचे रिसॉर्ट आहे. आपण येथे राहून आजूबाजूचा निसर्ग न्याहाळू शकतो. पावसानंतरच्या काळात तिथे छोट्या झुडुपांवर रंगीबेरंगी फुले फुलतात. या फुलांवर छोट्या छोट्या फुलपाखरांची भरपूर गर्दी पाहायला मिळते.
 
माळशेज घाट माहिती मराठी – या पठारापासून थोड्याच अंतरावर पिंपळगाव धरण आहे. या धरणाच्या बाजूला असणाऱ्या पाणीसाठ्यात परदेशी फ्लेमिंगो पक्षी राहायला येतात. सायबेरियातून येणारे पक्षी जुलै ते सप्टेंबर मध्ये भारतात येतात. आजूबाजूच्या शेतजमीन आणि पाणथळ प्रदेशात आणि धरणाच्या जागेत हे पक्षी वास्तव्य करून असतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात पक्षीनिरीक्षक आपले कॅमेरे घेऊन या पक्षांचे फोटो टिपण्यासाठी इथे सज्ज असतात.
 
माळशेज घाट हा मुख्य शहरांना जोडणारा प्रमुख रस्ता असून, या ठिकाणाहून बऱ्याच प्रकारच्या गाड्या पुणे-मुंबईला दळणवळण करत असतात.
माळशेज घाटाच्या बाजूला असलेलाच हरिश्चंद्रगड हे देखील एक प्रसिद्ध व प्रेक्षणीय स्थळ असून, माळशेज घाटाच्या मागे हरिश्चंद्रगडाची गगनभिडी डोंगररांग पसरलेली दिसून येते. माळशेज घाटाच्या तीन धारांमध्ये कोसळणारा धबधबा तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्कीच भेट दिली पाहिजे.
 
मुख्य शहर ते माळशेज घाट अंतर
मुंबई ते माळशेज घाट – १२२ किमी
पुणे ते माळशेज घाट – १२४ किमी
अहमदाबाद ते माळशेज घाट – ६२१ किमी
कोल्हापूर ते माळशेज घाट – ३६३ किमी
नाशिक ते माळशेज घाट – १३३ किमी
पर्यटन कालावधी/दिवस –
माळशेज घाट व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी अंदाजे तुम्हाला दोन दिवस लागू शकतात.
 
समोरच हरिश्चंद्रगडाची डोंगररांग तुम्हास या घाटाच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसी आहे. इथून पाहिले असता आद्राईचे जंगल, रोहिदास शिखर, तारामती शिखर, हरिश्चंद्रगड शिखर (बालेकिल्ला), जुन्नर दरवाजा वाट, नवरा-नवरी डोंगर, वर्हाड्याची डोंगररांग, नाणेघाट, सिंधळ्या-उधळ्या, हडसर, घुण्या, निमगिरी, भोजगिरी, दोंड्या व घाटघर आदि पर्वतरांगा नजरेस पडतात. मान्सून सिझन मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यास येतात
 
मोरोशी गावापासून थोड्याच अंतरावर काळू नावाचा धबधबा आहे. डोंगरावरचे पाणी घेऊन फेसाळत हा कड्यांवरून खाली बरसतो. आजूबाजूला छोटे छोटे ओढे जोराने धावत असतात. आणि ही सगळी निसर्गाची किमया बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
 
वाटेतच कारवॉश पॉइंट नावाच एक ठिकाण आहे. तिथे तर भर रस्त्यावर धो धो पाणी पडत असते. त्या पाण्याच्या खाली लोक गाडी धुऊन घेतात. आपल्याला इथे प्रवास करताना रस्त्याच्या आजूबाजूला तिकडचे स्थानिक रहिवासी छोटी छोटी दुकान टाकून रानभाज्या, फळे, मक्याची कणसे विकायला घेऊन बसलेले दिसतात.
 
माळशेज घाट जवळील प्रेक्षणीय स्थळे –
माळशेज घाटला भेट दिल्यानंतर माळशेज घाटच्या आजूबाजूच्या परिसराचा देखील तुम्ही मनमुरादपणे आनंद घेऊ शकता. त्यापैकीच काही प्रेक्षणीय स्थळे आम्ही आपणास सुचवत आहोत. या प्रेक्षणीय स्थळांना देखील तुम्ही नक्कीच भेट द्या.
 
माळशेज धबधबा (Malshej Ghat Waterfall) –
खडकाळ व उंच उंच टेकड्या, तसेच हिरव्यागार व पांढऱ्याशुभ्र धुक्याच्या थरामधून कोसळणारा भयानक प्रवाह आणि तयार झालेला एक आगळावेगळा देखावा, म्हणजे माळशेज धबधबा. माळशेज घाट मधील माळशेज धबधबा हा ट्रिप साठी एक आदर्शाचे, तसेच धावपळीच्या आयुष्यातून एक सुखद अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या धबधब्याचे खरे सौंदर्य अनुभवायचे असल्यास, पावसाळ्यामध्ये माळशेज घाटाला नक्की भेट दिली पाहिजे.
 
भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना – जून ते सप्टेंबर
 
पिंपळगाव जोगा धरण –
माळशेज घाटापासून साधारणतः १७ ते १८ किलोमीटर इतक्या अंतरावर असणारा पिंपळगाव जोगा धरण हे पुष्पावती नदीवर बांधले आहे. रंगीबेरंगी आकाशाच्या छटा व छायांकित टेकड्यांसह विहंगम दृश्य देणाऱ्या सूर्यास्ताचे छायाचित्र कॅप्चर करण्यासाठी असणारे पिंपळगाव जोगा धरण हा एक उत्तम पर्याय आहे.
 
सर्व छायाचित्र महाराष्ट्र शासन 
 
Edited By - Ratnadeep ranshoor