मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 5 मार्च 2019 (14:36 IST)

मराठा क्रांती मोर्चा 6ला रणनीती आखणार

मराठा समाजाला सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोकमोर्चा यांनी एकत्रितपणे सरकारविरोधात एल्गार पुकारला असून सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 6 मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे.
 
संघटनेतील एका समन्वयकाने सांगितले की, 29 नोव्हेंबर 2018ला राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची घोषणा केली. मात्र उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर राज्य शासनाने स्वतःहूनच सर्व शासकीय विभागांना मराठा आरक्षणातून नियुक्ती देऊ नका, असे आदेश दिले आहेत. या छुप्या आदेशाद्वारे सरकारने कुटनीतीने मराठा समाजाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.