गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईतील मराठा मोर्चा आता 6 मार्चला

जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत होणार्‍या मराठा मूक मोर्चाची तारीख बदलण्यात आली असल्याचे वृत्त आहे. 31 जानेवारीला होणारा मुंबईतील मोर्चा आता 6 मार्चला आयोजित करण्यात येणार आहे तर 31 जानेवारीला मुंबईत मोर्चा काढण्याऐवजी राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. मात्र ‍अधिकृतपणे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
 
संबंधित वृत्तानुसार, रविवारी झालेल्या मराठा संघटनांच्या राजस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सुरूवातीला 31 जानेवारीला मोर्चा आयोजित केला जाऊ नये, असा राज्यातील प्रतिनिधींचा सूर होता. मात्र औरंगाबादचे प्रतिनिधी 31 जानेवारीच्या मोर्चावर ठाम होते. अखेर 31 जानेवारीला मुंबईत मोर्चा काढण्याऐवजी राज्या चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासोबत 31 जानेवारीला मुंबईत होणार्‍या मोर्चाची तारीख 6 मार्च करण्यात आली.