शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पंचवटी , शनिवार, 29 जुलै 2017 (16:41 IST)

९ ऑगस्ट मुंबई मोर्चा संदर्भात सर्व पक्षीय सकल मराठा समाजाची नाशिकबैमध्ये बैठक

नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चा जो ९ ऑगस्ट रोजी होणार आहे त्याच्या तयारी साठी अंशिक येथे सकल समाजाची बैठक घेण्यात आली आहे.९ ऑगस्ट मुंबई मोर्चा यशस्वी करण्यासाठी बैठकीला छत्रपती शिवाजी राजेंना पुष्पहार घालून शिवशाहीर स्वप्नील ढोंबरे यांच्या पोवाड्यांनी सुरवात करण्यात आली,वरदलक्ष्मी लॉन्स, औरंगाबाद रोड येथे पार पडली, नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व पक्षीय,संघटना नेते,कार्यकर्ते यांची बैठक ठेवण्यात आली, यात मोर्चा हा लाखोंच्या समाज बांधवांचा भव्य असा झाला पाहिजेत, त्या साठी नाशिक मधून जास्तीत जास्त जोर लावला गेला पाहिजेत त्या साठी नियोजन शेवटच्या टप्यात येऊन पोचले आहेत त्या दिशेने कामाला लागावे असे आव्हान करण्यात नियोजन समितीच्या वतीने करणयात आले तसेच मोर्चा साठी जबाबदारया,मार्गदर्शन देखील या वेळी करण्यात आले आहेत.

बैठकीत मार्गदर्शन माणिकराव कोकाटे, प्रशांत दादा हिरे, सुनील भाऊ बागुल, विजय आप्पा करंजकर, रवींद्र पगार,शिवाजी सहाणे,जयंत दिंडे, करण गायकर, गणेश कदम, चंद्रकांत बनकर,उमेश शिंदे, तुषार जगताप आदीने केले.

बैठकीत नियोजना साठी लागणार फंड उपलब्ध करणे, नाशिकवरून जाणाऱ्या समाजबांधवांना मुंबई मार्गावर जागो जागी खाण्याचे व्यवस्था, पिण्याचं पाणी, सुलभ सोचालय व्यवस्था, मेडिकल व्यवस्था, महिला सुरक्षिता व्यवस्था, स्वयंसेवकांना कामा प्रमाणे टी- शर्ट कलर कोड देणे, ट्राफिक नियोजन कसे व्यवस्थित होईल याच नियोजन, टुव्हीलर रॅली काडण्याचा निर्णय, सोशल मीडिया नेटवर्किंग, झेंडे, बॅनर, स्टिकर लावायाला सुरवात करावी, त्याच बरोबर समाज एकत्र राहिला पाहिजेत या पुढे, राजकारण,समाजकारण सर्व बाजूला ठेवून समाज बांधव म्हणून सर्वांनी जबाबदारी, योगदान, त्याग केला पाहिजेत, समाजात अनेक अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मोर्चा हाच एकमेव परियाय नाहीत,त्यासाठी सर्वानी समाजातील अडचणीत असलेल्या बांधवांना मदत देखील या पुढील काळात केली पाहिजेत, या पुढे पक्ष बाजूला ठेवून खाजदर,आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी पद बाजूला ठेवून समाजाच्या कामासाठी पुढे आले पाहिजेत असे अनेक सूचना,मार्गदर्शन करण्यात आले.