शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 जानेवारी 2023 (17:14 IST)

बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट,कामगार जखमी

सोलापुरातील बार्शी तालुक्यात पांगरी जवळ फटाक्याच्या फेक्टरीत फटाके नंबर असताना भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. या फेक्टरीत 40 हुन अधिक कर्मचारी काम करत होते. सहा जण जखमी झाले आहे. स्फोटाची माहिती मिळतातच आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. या स्फोटात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य देखील सुरु आहे. 

या अपघातात जीवितहानी झाल्याचे अधिकृत वृत्त मिळाले नाही. या फेक्टरीत 40 कर्मचारी काम करत होते. फटाके बनवताना भीषण स्फोट झाला. अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited By - Priya Dixit