शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024 (10:33 IST)

पालघरमध्ये कारखान्यात लागली भीषण आग, व्हिडीओ वायरल

Palghar News : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूरजवळील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कारखान्याला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  
 
मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

घटनास्थळावरून दिसलेल्या दृश्यांमध्ये कारखान्यातून धुराचे लोट उठताना दिसत आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  

Edited By- Dhanashri Naik