मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (12:12 IST)

नाशिकमध्ये मॉलला भीषण आग, लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक

नाशिकच्या गंजमाळ परिसरात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्यात लाखो रुपयांचे विद्युत साहित्य जळून खाक झाले आहे.
 
रविवारी इलेक्ट्रिकल दुकान बंद असल्यामुळे तसेच मध्यरात्री ही आग लागल्याने आग दुकानाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. या आगीत मोठे नुकसान झाले आाहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना खूप प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आग विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.