बुधवार, 19 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (08:15 IST)

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया एरोस्पेस प्लांटमध्ये भीषण आग, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

fire
अमेरिकेतील एका एरोस्पेस उत्पादकाच्या कारखान्यात भीषण आग लागली. मंगळवारी स्थानिक शाळा बंद ठेवाव्या लागल्या यावरून आगीची तीव्रता किती होती याचा अंदाज येतो. स्थानिक रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले. वृत्तसंस्था एपी ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग फिलाडेल्फियाच्या उत्तरेला लागली. 
सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 9:30 वाजता जेनकिनटाउन येथील एरोस्पेस उत्पादक एसपीएस टेक्नॉलॉजीजच्या प्लांटमध्ये भीषण आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटानंतर गोदामात आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.
अबिंग्टन टाउनशिप पोलिस विभागाने सांगितले की इमारत ताबडतोब रिकामी करण्यात आली. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झाले नाही.
 
Edited By - Priya Dixit