बीएमसी, कोर्ट आणि बिग बींच्या बंगल्याला धमक्यांचे ईमेल पाठवणार मास्टरमाईंड अमेरिकेतील ''सॉफ्टवेअर इंजिनिअर''
मुंबईतील बीएमसी कार्यालय, मेट्रो स्टेशन, बीएसई, शाळा आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला धमकीचे ईमेल पाठवल्याचा पोलिसांना एका २८ वर्षीय व्यक्तीवर संशय आहे. पोलिसांच्या मते, त्याने दोन वर्षांत अंदाजे १,५०० बनावट धमकीचे ईमेल पाठवले असावे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील बीएमसी मुख्यालय, मेट्रो स्टेशन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), न्यायालये, शाळा आणि चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला आलेल्या बॉम्बच्या धमक्यांप्रकरणी पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा लागला आहे. मुंबई पोलिसांचा असा विश्वास आहे की, अमेरिकेत काम करणारा एक २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर या धमक्यांमागे आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने देशभरातील विविध संस्थांना अंदाजे १,५०० बनावट धमकीचे ईमेल पाठवल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तामिळनाडू दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शंकरला चेन्नई विमानतळावरून ताब्यात घेतले. तो सध्या तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलिसांच्या ताब्यात तो आल्यावर, त्याने हे धमकीचे ईमेल का पाठवले आणि त्याचा खरा हेतू काय होता, हे जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी केली जाईल.
वृत्तानुसार, या धमक्यांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने, आरोपीने पाठवलेल्या एका ईमेलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्याशी संवाद सुरू केला. संभाषणादरम्यान, अधिकाऱ्याने अनेक प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे शंकरने त्याच्या वैयक्तिक ईमेल पत्त्यावरून दिली. आपण एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलत आहोत याची त्याला कल्पना नव्हती. ही माहिती मुंबई पोलिसांना त्याला ओळखण्यासाठी आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी पुरेशी होती. ही माहिती तामिळनाडू पोलिसांना देण्यात आली, ज्यामुळे अमेरिकेतून परतल्यानंतर चेन्नई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. तो सध्या तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपीला त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर, या धमक्यांमागील खरा हेतू उघड करण्यासाठी त्याची कसून चौकशी केली जाईल.