सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 27 मे 2021 (13:25 IST)

माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये

भाजपाने शिवसेनेला जोरदार दणका दिला असून भाजपाने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या 14 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोल्हापूर येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
 
आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष), राकेश चौधरी (नगरसेवक), सोनम दाबेकर (नगरसेवक), प्रतिभा घावरे (नगरसेवक), सुषमा जाधव (नगरसेवक), प्रियांका कदम (नगरसेवक), ज्योती सोनवळे (नगरसेवक), संदीप कदम (नगरसेवक), चंद्रकांत जाधव (नगरसेवक), रुपाली आखाडे (नगरसेवक) यांनी भाजपात प्रवेश केला.
 
शिवसेनेच्या दहा नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. ठाकूर यांची कार्यशैली व नेतृत्व भावल्यामुळं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं या नगरसेवकांचं म्हणणं आहे. शिवसेनेनं कालच जळगावच्या मुक्ताईनगरात भाजपला धक्का दिला.