रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (11:46 IST)

महाराष्ट्रात पुन्हा लाजिरवाणी घटना, मौलानाने 11 वर्षाच्या मुलीसोबत केले दुष्कर्म

crime
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासला आहे. एक उर्दू शिक्षकावर 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अनेक वेळेस लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध पेठ बीड पुलिस स्टेशन मध्ये पॉस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार तो मागील पाच ते सहा महिन्यांपासून दुष्कर्म करित होता. आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अल्पवयीन मुलीच्या पालकांना ही घटना कळल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे पालक घरी नसताना हा नराधम तिच्यासोबत दुष्कर्म करायचा.
 
पीडित मुलगी गेल्या सहा-सात महिन्यांपासून आरोपींकडे उर्दू शिकण्यासाठी जात होती. तक्रारीनुसार, मुलीवर सात ते आठ वेळा लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik