शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 डिसेंबर 2017 (09:15 IST)

हार्बर लाईनवर पुन्हा दोन दिवस मेगा ब्लॉक

हार्बर लाईनवरील संकेटे काही दूर होतांना दिसत नाही. यात पुन्हा दोन दिवस ही लोकलची लाईन बंद राहणार आहे. यामध्ये या  मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी २७ ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील जवळपास सर्व फेऱ्या रेल्वेने रद्द करण्यात आल्या आहेत. या आगोदर मंगळवारी हार्बर मार्गावर बेलापूर स्टेशनवर पेंटाग्राफ तुटली होती त्यामुळे  वाहतूक विस्कळीत झाली. तर या दुसरीकडे  बेलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ च्या वायर नादुरुस्त झाल्या, फलाट क्रमांक एकचं काम पूर्ण करत र्लेवे लोकल  वाहतूक पूर्व पदावर आणली गेली होती. मात्र पुन्हा आज  फलटा क्रमांक दोनचं काम हाती घेतले आहे. या कामासाठी हार्बर मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी मंगळवार मध्यरात्री ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक रेल्वेने जाहीर केला आहे. हार्बर मार्गावर चालणा-या ६०४  फे-यांपैकी ३४ फेऱ्या रद्द आहेत यामुळे मागील आठवड्याप्रमाणेच प्रवाशांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. या प्रकारामुळे प्रवासी वर्गात रेल्वबद्दल राग निर्माण झाला आहे.