गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अखेर कसारा लोकल सुरु झाली

मुंबईला सर्वात महत्वाची जोडणारी आणि रोज लाखो प्रवासी प्रवास करणारी लोकल अखेर आज सुरु झाली आहे. काही  दिवसापूर्वी पावसामुळे जमीन खचल्याने दुरंतो एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. त्यामुळे या महत्वाच्या मार्गावरील कसारा मार्ग पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे या मार्गावरील रोज नोकरीसाठी प्रवास करत असलेल्या नागरिकांचे फार हाल झाले. 
 
या अपघातामुळे या मार्गावरील पाच दिवसापासून लोकल प्रवास कसारा दरम्यान बंद होता. त्यामुळे प्रवासी संतप्त होते. तर रोजचे कामकाज करत असलेले प्रवासी फार हाल सहन करत होते. त्यामुळे प्रवासी वर्गाने  संतापून शुक्रवारी सकाळी प्रवाशांनी वाशिंद स्थानकात रेल रोको केला होता. तर शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी रेल्वे अधिकारी एजीएम अग्रवाल यांनी भेट घेण्यास गेले होते. त्यावेळी रेल्वे अधिकारी वर्गाने पूर्ण माहिती जाणून घेतली आणि कसारा मार्गाचे काम युद्ध पातळीवर सूरु असल्याचे सागितले होते. शनिवारी सकाळीच ८ वाजून ९ मिनिटांनी आसनगाववरून कसारा लोकल रवाना झाली.