बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 सप्टेंबर 2017 (09:03 IST)

सरकार अस्तित्वात असल्याची जाणीवच होत नाही - सचिन अहिर

प्रशासनाकडून धोकादायक इमारतींची पाहणी केली जात नाही. मंत्री कुठे आहेत ते राज्यातील जनतेला माहिती नाही. हे सरकार अस्तित्वात आहे की नाही याची जाणीवच होत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी दिली. सकाळी मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनीवाला बिल्डिंग पडण्याची दुर्दैवी घटना घडली. सचिन अहिर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना अहिर म्हणाले की भाजपचे सरकार येऊन तीन वर्षे झाली. आतापर्यंत रिपेअर बोर्डाच्या अध्यक्षांची निवड झाली नाही. रिपेअर बोर्डाचे सदस्य निवडले गेले नाही अशा प्रकारचा बेजबाबदारी कारभार सध्याच्या सरकारचा सुरू आहे.