संबंधित माहिती
- मंत्री पदाची पर्वा नाही’, ‘उद्याच राजीनामा देतो’; राज्यमंत्री बच्चू कडूंचे मोठे विधान
- इगतपुरी तालुक्यातील १७८६ रेशन कार्ड अर्ज नामंजूर; भुजबळांची विधिमंडळात माहिती
- बनावट लग्न लावून लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले गजाआड
- व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्यासाठी तब्बल १८ लाखांची फसवणूक
- भाजपची विजयाची घोषणाबाजी, CMने माईक बाजूला सारला आणि यशोमती ठाकूरांनी रस्ता बदलला
वाशीम येथे बापाने 1 वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरले
वाशीम: सुरेश घुगे असे निर्दयी पित्याचे नाव असून त्याने आपल्या १ वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरल्याची (buried) घटना काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत शेतातील गोठ्यावर राहत होता. पती-पत्नींना तीन मुली असून, सुरेश हा नेहमी कावेरीच्या चारित्र्यावर संशय घेत असे यातूनच दोघांमध्ये नेहमी वाद व भांडण होत असत
सुरेशला दारूचे व्यसन असल्याने, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी दिराला हकिकत सांगितली. गावातील नागरिक शेताकडे गेले असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली असता ही हकीकत त्याने स्वतः सांगितली. याबाबतची माहिती रिसोड पोलिसांना दिली. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून, आरोपी पिता सुरेश घुगे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
