1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Milind Narvekar was blocking a bungalow in lockdown, CBI should investigate - Somaiya

मिलिंद नार्वेकर लॉकडाऊनमध्ये बंगला बाधत होते, CBI चौकशी व्हावी - सोमय्या

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मिलिंद नार्वेकर 10-15 कोटींचा बंगला बांधत होते, त्यासाठी बऱ्याच नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.
 
किरीट सोमय्यांनी या आरोपांचा व्हीडिओ ट्विटरवर, फेसबुकवर पोस्ट केला असून, त्याद्वारे मिलिंद नार्वेकरांच्या सीबीआय चौकशीची मागणीही केली आहे.
 
"लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते, तर डावा हात मिलिंद नार्वेकर बंगला बांधत होते," असा आरोप सोमय्यांनी केला.
 
तसंच, मिलिंद नार्वेकर यांनी साडेचारशे झाडं तोडून बंगला उभारायचं काम सुरू केल्याचं सोमय्यांचं म्हणणं आहे.
 
मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव आहेत.
 
पुढील लेख
PMC बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आणखी 6 महिन्यांनी वाढले