नागपूर, अमरावती पाणी संकटाबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बैठक घेणार  
					
										
                                       
                  
                  				  नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांमधील संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे महसूल मंत्री आणि दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
	नागपूर आणि अमरावती शहरांसह जिल्ह्याला पुरेसे पाणी मिळावे यासाठी ही योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
				  				  				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	उन्हाळी हंगामात जिल्ह्यात कुठेही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू नये यासाठी 37कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाईबाबत 22 मार्च रोजी बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते नागपूर येथील जिल्हा नियोजन भवनात पत्रकारांशी बोलत होते.
				  																								
											
									  
	Edited By - Priya Dixit