1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 मार्च 2025 (17:35 IST)

औरंगजेबाच्या कबर बाबतीत बजरंग दल आणि विहिंपने दिला इशारा, एसआरपीएफचे जवान तैनात

छत्रपती संभाजी नगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात असून या प्रकरणी महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शनमध्ये आले आहे. महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. 
छत्रपती संभाजी नगर मधील औरंगजेबाच्या कबर जवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. बजरंगदल आणि विश्वहिंदू परिषदने इशारा जारी केल्यांनतर कबरे जवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त केला असून सुरक्षा वाढवली आहे. या ठिकाणी राज्य राखीव दलाचे एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे. 
काही दिवसांपूर्वी देशभरात छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती सर्वाना झाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ ज्या क्रूरतेने केला आणि त्यांची हत्या करण्यात आली हे पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 
 
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने औरंगजेबाच्या थडग्याच्या देखभालीसाठी पॅकेज जाहीर केले होते. दुसरीकडे, काही हिंदू संघटना औरंगजेबाने केलेल्या अत्याचारांच्या इतिहासाची आठवण करून आक्रमक झाल्या आहेत. तसेच, या संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर हटवण्याची मागणी करणारा इशारा दिल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.. यानंतर प्रशासन सक्रिय झाले आहे. औरंगजेबाच्या कबर भोवती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे 

छत्रपती संभाजीनगर येथील कबरीच्या ठिकाणी दोन पोलिस अधिकारी आणि 15 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी आज कबरीच्या आत पाहणी केली. त्यांनी कबरीत दोन ठिकाणी घेराबंदी केली आहे. दोन ठिकाणी निश्चित बिंदू बनवण्यात आले आहेत.आणि कबरीच्या ठिकाणी एसआरपीएफचे पथक तैनात करण्यात आले. आहे.
 
Edited By - Priya Dixit