शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 मार्च 2025 (17:20 IST)

कर्जाच्या ओझ्याने दबलेला महाराष्ट्र म्हणत प्रियांका चतुर्वेदींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

Priyanka Chaturvedi
महायुती सरकार ने विधानसभेत आगामी वर्ष 2025 -26चा अर्थसंकल्प सादर केला.महाराष्ट्र विधानसभा निवणुकीपूर्व सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बजेटमध्ये सरकारने मोठी कपात केली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे बजेट 46 हजार कोटी रुपयांवरून 36 हजार कोटी रुपये केले आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयांनंतर विरोधकांनी विधानसभेच्या बाहेर निदर्शने केली. लाडकी बहिणींची फसवणूक केल्याचे विरोधक म्हणाले. या वर शिवसेना यूबीटीच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्रीवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाला, देवेंद्र फडणवीस अशी विधाने करत आहे. जी त्यांच्या शब्द आणि कृतीशी जुळत नाही. ते फक्त बातम्या मिळवण्यासाठी अशी विधाने करतात. 
त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला जे आश्वासन दिले आहे मग ते लाडकी बहीण योजना असो. ते पूर्ण करावे. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये दिले जात नाही. आणि अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. महाराष्ट्रावर कर्जाचा बोझा वाढत आहे. हे अर्थसंकल्पातून दिसत आहे. त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिले आणि या दिशेने काम केले तर ते महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगले होईल. 
Edited By - Priya Dixit