मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2 हजार हून  अधिक लाभार्थी सरकारी कर्मचारी असल्याचा मंत्र्यांचा खुलासा  
					
										
                                       
                  
                  				  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारमधील एका मंत्र्यांनीच धक्कादायक खुलासा केला आहे. राज्य सरकारच्या मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या चौकशी दरम्यान या योजनेचे लाभ घेणाऱ्या 2000 हून अधिक लाभार्थी सरकारी कर्मचारी असल्याचे आढळून आले आहे. 
				  													
						
																							
									  				  				  
	महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सदर माहिती दिली. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	त्या म्हणाल्या, लाभार्थ्यांची पडताळणी ही नियमित प्रक्रिया असेल.
	 				  																								
											
									  सुमारे 2 लाख अर्जाची छाननी केल्यावर 2289 लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी असल्याच्या आढळून आल्या.हे उघडकीस आल्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही. 
	 				  																	
									  
	या योजनेअंतर्गत फक्त लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरुच राहणार असे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे  यांनी स्पष्ट केले आहे. 
				  																	
									  
	Edited By - Priya Dixit