रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (16:39 IST)

मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील !

uday samant
विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी बंडाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेसोबत काही आमदार गुजरातमधील सुरतमध्ये आणि तिथून गुवाहाटीला गेले. सुरुवातीला 20-25 संख्या असलेले आमदार 40 च्या वर गेले आहेत.आमदारांनी बंड पुकारल्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आली आहे. 
 
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडात सहभागी होत असलेल्या आमदारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसतेय.
 
कालपर्यंत शिवसेनेच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी होत असलेले कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंतही 'नॉट रिचेबल' झालेत.एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांची संख्या 46 झालीय. आता ठाकरे सरकारला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. सध्या एकनाथ शिंदे यात शिवसेनेचे 37 आणि इतर 9 आमदार आहेत. यात 7 जण कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री उदय सामंत गुवाहाटीत पोहोचले, तर शिंदे गटातील आमदारांची संख्या 47 वर पोहोचेल.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले उदय सामंत काल शिवसेनेच्या बैठकीत उपस्थित होते. पण आज ते नॉट रिचेबल आहे आणि ते सुरतहून फ्लाईट ने गुवाहाटीला पोहोचण्याचे सांगितले जात आहे. उदय सामंत यांचे नॉट रिचेबल असणं ठाकरे सरकारसाठी धक्कादायक आहे.