1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (13:51 IST)

दारूच्या नशेत सासू सासऱ्यांची हत्या, आरोपी जावयाला अटक

murder
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात अमर नगर परिसरात रविवारच्या मध्य रात्री दारूच्या नशेत जावयाने आपल्या सासू -सासऱ्यांची निर्घृण हत्या केली. तर पत्नी आणि मुलीला देखील ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत आरोपीची पत्नी आणि मुलगी गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपीचे सासू -सासरे भगवान रेवारे आणि पुष्पा रेवारे हे मयत झाले आहे. या घटनेत आरोपी नरमू यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

माहितीनुसार, गेल्या तीन ते चार दिवसांपासून कुटुंबात वाद होत होते. नंतर हे वाद विकोपाला गेले आणि रागाच्या भरात आरोपी नरमू यादव याने शनिवारी मध्यरात्री दारू पिऊन दारूच्या नशेत सासू -सासऱ्यांवर कुऱ्हाडीने वार केले आणि एवढेच नाही तर त्याने आपल्या मुली आणि पत्नीवर देखील कुऱ्हाडीने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात आरोपीचे सासू सासरे हे मरण पावले तर पत्नी आणि मुलगी दोघी गंभीररित्या जखमी झाल्या . या घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले आणि जखमी झालेल्या पत्नी कल्पना आणि मुलगी मुस्कान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.