1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (11:22 IST)

पोपळकरवाडीत अपघातात 3 जण ठार

निमसोड -म्हासुर्णे मार्गावर पोपळकरवाडी येथे एका दुचाकीवर ट्रिपल सीट निघालेल्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.
 
गजानन दडबे हे आपल्या मोटारसायकल वरून दोन कामगारांना घेऊन निमसोड कडे जात असताना त्यांच्या वाहनाला एका अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्यात हे तिघे जागीच ठार झाले. वाहनचालक घटनेनंतर पसार झाला.घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिघांचे मृतदेह वडूजला शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.