शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (21:48 IST)

नाशिकमध्ये शिवसेनेचा उद्या विराट मोर्चा

राज्यात सुरु असलेल्या शिवसेनेच्या बंडखोरीवरुन सध्या सर्वत्रच राजकारण तापू लागले आहे. त्यातच आता नाशिकच्या शिवसैनिकांनी उद्या विराट मोर्चाचे आयोजन केले आहे.

राज्यात सुरू असलेल्या शिवसेनेच्या बंडखोरीचे पडसाद मागील दोन-तीन दिवसापासून नाशिक शहरातील दिसू लागले आहेत. शिंदे समर्थकांनी शहरात होर्डिंग लावून शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे तर दुसरीकडे शिवसैनिकांनी या होर्डिंगवर काळे फासण्याचा प्रकार केला होता. यामुळे शहरात काही काळ तणाव सुद्धा निर्माण झाला होता. त्यातच आता शिवसेनेने उद्या सकाळी 10.30 वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे.

शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून हा मोर्चा निघणार असून शिवसैनिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.