सोमवार, 2 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (21:24 IST)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत झाले “हे” महत्वाचे ५ ठराव

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत 5 महत्वाचे ठराव करण्यात आले. या बैठकीत झालेल्या ठरावांमुळे बंडखोर शिंदे यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत झालेले ५ ठराव
१. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.
२. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांना देत आहे.
३. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.
४. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि कायम राहील.
५. शिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.