1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 26 जून 2022 (11:34 IST)

Ashadhi Wari 2022 :आज माऊलींची पालखी खंडोबाच्या भेटीला जेजुरी पोहोचणार

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने आज जेजुरीच्या दिशेने प्रस्थान केले.यवत येथे दोन दिवस मुक्काम केल्यानंतर आज माऊलींची पालखी खंडेरायाच्या भेटीला जेजुरी येथे प्रस्थान करणार आहे. सासवड येथे माउलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक जमा झाले होते. आज यवत वरून मुक्काम हलविल्यानन्तर संत तुकाराम महाराज यांची पालखी वरवंड येथे मुक्काम करणार आहे. पालखीतील वारकरींना आता खंडोबाला भेटण्याची आस लागली आहे.  

सासवड येथून पालखी सोबतचे वारकरी जेजुरीला पोहचत आहे. आता खंडोबाच्या भेटीसाठी वारकरी देखील आतुर झाले आहे. आज पालखीत सासवड येथून मुक्काम हलविल्यावर यळकोट यळकोट जय मल्हारचे जयघोष होऊ लागले. 
 सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेजुरी नगरीमध्ये माऊली महाराजांचा पालखी सोहळा पोहोचणार आहे.पालखी मार्गावरील कमानीजवळ जेजुरीकरांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात येते. माउलींच्या पालखीवर भंडारा उधळला जातो. जेजुरी गडावर पोहोचल्यावर पालखीचा मुक्काम येथे असणार.