शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (08:31 IST)

अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात दोन घटना

शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे भागात घडली.

अंबड लिंक रोडवरील घरकुल भागात राहणारी अल्पवयीन मुलगी मंगळवारी शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप परतली नाही. उशीरापर्यंत घरी न परतल्याने पालकांनी शाळेत धाव घेतली असता ती शाळेत गेली नव्हती. त्यामुळे तिला कशाचे तरी आमिष दाखवून कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

दुसरी घटना पेठरोडवरील श्रीरामनगर भागात घडली आहे.येथील अल्पवयीन मुलगी गेल्या शुक्रवार (दि.१९) पासून बेपत्ता आहे. कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असतांना तीने घरास कुलूप लावले व चावी आपल्या लहान बहिणीकडे देवून कुठे तरी निघून गेली आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.