नाशिकच्या पंचवटीत बाप लेकाने घेतली गळफास
नाशिक शहरात एका धक्कादायक घटनेत येथील पंचवटी परिसरात बाप लेकाने आत्महत्या केल्याचे समजते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकममधील पंचवटी परिसरात बाप लेकांनी आत्महत्या केली. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असे वडील-मुलाचे नाव आहे. जाधव यांनी आपल्या मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.