राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाल्याची बातमी आहे. पुण्यात 21 मे नदीपात्रात ही सभा होणार होती परंतु पावसाचे कारण देत ही सभा रद्द करण्यात आली आहे.
मनसेकडून पुणे डेक्कन पोलिसांना ही सभा रद्द करण्याबाबदचे पत्रही देण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यापूर्वी ही सभा महत्त्वाची मानली जात असताना ती अचानक रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या विषायवरून आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. त्यापूर्वी 21 मे रोजी पुण्यातील नदीपात्रात राज ठाकरेंची भव्य सभा होणार होती. तसेच राज ठाकरे स्वत: दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतानाच या तारखेची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता अचानक सभा रद्द झाली आहे. मनसेकडून हवामानाचा अंदाज घेत पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली आहे.