शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (12:09 IST)

सभा करायच्याच असतील तर अयोध्येत करून दाखवा, दीपाली यांचा राज ठाकरेंना टोला

dipali sayyad raj thackeray
मुंबई- आपल्या डान्सच्या कौशल्यानं सर्वांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपली सय्यद या मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहे. आज पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर पुण्यातील सभेवरून निशाणा साधला आहे.
 
दीपाली सय्यद यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे की सभा करायच्याच असतील तर अयोध्येत करून दाखवा पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात तेही जास्त गर्दी करून. दीपाली सय्यद यांनी हे ट्वीट शिवसेना तसेच राज ठाकरे व मनसेला टॅग केलं आहे.