1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (14:37 IST)

आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला अटक

arrest
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड ला पोलिसांनी अटक केली आहे. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे प्रकरणी मुलासह त्यांच्या कारचालक रणजित यादवला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्यांच्या शोधात होती. आज दोघांना अटक केली असून त्यांना उल्हासनगरच्या कोर्टात हजर करणार आहे. आमदार गणपत यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात गणपत यांचा मुलगा आणि कार चालक दोघांना अटक केली आहे. 
 
 गणपत गायकवाड यांनी उल्हास नगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली. सध्या ते कळवा पोलीस ठाण्यात आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात जेवण सोडल्याचे वृत्त मिळालेत आहे. 

गणपत यांनी अन्न त्याग केले आहे. गोळीबार प्रकरणात अद्याप 6 जणांना अटक केली असून आता गणपत यांचा मुलगा आणि इतर दोघांना अटक केली असून एकूण 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit