रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (09:27 IST)

आमदाराने पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे मान शरमेने खाली गेली --- विजय वडेट्टीवार

vijay vadettiwar
भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून राज्याच्या आदर्श राजकीय परंपरेला काळीमा फासला आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  केली.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेला गोळीबार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांसोबाबत गुंडानी छायाचित्र काढणे आदी मुद्द्यांवरून वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुखावर गोळीबार केला. यानंतर गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या काळात गुन्हेगारी वाढत आहे.

भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप केला. या आरोपांना मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने पुष्टी दिली. कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने चक्क वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची भेट घेतली. याचा अर्थ महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor