शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (08:34 IST)

आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना

yogesh kadam
दापोलीचे विद्यमान आमदार योगेश कदम  हे शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे  यांच्या भेटीसाठी गुहाटीला रवाना झाले आहेत. यामुळे दापोली विधानसभा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
 
आमदार योगेश कदम हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. काल ते दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी होते. मात्र रात्री ते अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरिता गुवाहटीला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे.