मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (08:37 IST)

वाढीव वीज देयकांबद्दल मनसेची आंदोलनाची तयारी सुरू

लॉकडाऊन काळात आलेलं वाढील वीजबिल कमी होणार नसल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केल्यानंतर विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामध्ये आता मनसेनंही उडी घेतल्याचं दिसत आहे. वाढीव वीज देयकांबद्दल महाविकास आघाडी सरकार विरोधात मनसेची आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. 
 
वाढील बिलाविरोधात 26 तारखेला मनसे राज्यव्यापी आंदोलन करणार असून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षाकडून आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये आंदोलनाची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
 
दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती.