गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (22:33 IST)

मनसेची ‘५० खोके’ स्पर्धा; सामान्यांना पाहता येणार, काय झाडी, काय डोंगर, शिंदेना डिवचले

vaibhav khedekar
राज्यात ५० खोके, एकदम ओके हा शब्द खूप चर्चेत आला असून शिंदे गटावर विरोधकांनी ५० खोक्यांवरून रान उठवले होते. शिंदे गटाला ५० खोक्यांचा आरोप चांगलाच जिव्हारी लागला होता, याविरोधात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात तर त्यांच्या गटाच्या लोकांनी पायऱ्यावर तुफान बॅटिंग केली होती. मात्र ‘५० खोके’ हा शब्द काही शिंदे गटाची पाठ सोडायला तयार नाहीये. आता दांडियामध्ये मनसेच्या वतीने भरघोस बक्षिसांच वाटप होणार असून त्या
बक्षीस वाटप समारंभाच नाव ‘पन्नास खोके बक्षीस योजना’ येणार आहे. गुवाहाटी, सुरत आणि गोवा टूर पॅकेज असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच.
 
५० खोके, एकदम ओके
नवरात्र काळात नवरात्रोत्सव मंडळे, सामाजिक संस्था, युवा मंडळ आदी रास दांडिया स्पर्धेचे आयोजन करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे देखील नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. या उत्सवा निमित्त मनसेने दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यातील विजेत्यांना भरघोस बक्षीस देण्यात येणार आहेत या बक्षीस योजनेस मनसेनं पन्नास खोके बक्षीस योजना असे नाव दिले आहे. प्रतिवर्षा प्रमाणे यंदा छत्रपती शिवाजी चाैकात अंबामातेची प्रतिष्ठपना करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा विषयक आणि दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसंदर्भात मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी माहिती दिली आहे.
 
 गुवाहाटी, सुरत आणि गोवा टूर पॅकेज
तसेच यास्पर्धेत रास दांडिया स्पर्धेतील विजेत्यांसाठी गुवाहाटी, सुरत आणि गोवा टूर पॅकेज असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याबरोबरच इतर 50 बक्षीसे देखील आहे. त्यास 50 खोके बक्षीस योजना असे नाव देण्यात आले आहे असे खेडेकर यांनी नमूद केले. त्यामुळे आता या स्पर्धेची चर्चा राज्यभर होत असून अनेकांनी स्पर्धेत सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. आणि अप्रत्यक्षपणे मनसेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्यासह गटाल डीवचण्याचे काम यामाध्यमातून करण्यात आले आहे.
 
सामान्य जनतेलाही पहायचं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल
राज्यातील सत्तांतराच्या नाट्यापूर्वी शिवसेनेतील शिंदे गटाने सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा जो प्रवास केला त्याचा अनुभव सामान्य जनतेला देखील यावा यासाठीच अशा स्वरूपाची बक्षिसे ठेवली असल्याची माहिती मनसेच्या खेडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे मनसे आपल्या अनोख्या कार्यक्रमांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.