रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (22:24 IST)

नाशकात मराठी मुद्यावरून मनसेचा खळ खट्याकचा इशारा

maharashatra navnirman sena
नाशिकमध्ये मराठी फलक मुद्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली असून ८ दिवसांमध्ये जर मराठी फलक लावण्यात आले नाही तर “मनसे स्टाईल’ आहेच म्हणत इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नाशकातील वातावरण ढवळून निघाले आहे. नुकताच भोंगे मुद्दा थोडा शांत झाला होता मात्र आता मनसे पुन्हा ‘एकदा मराठी फलक’ मुद्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली असून मराठी फलक लावा नाहीतर मनसे स्टाईल आहेच असे अल्टिमेटम मनसे विद्यार्थी सेनाचे शाम गोहाड यांनी दिला आहे.
 
मनसे विद्यार्थी सेना आक्रमक
शहरातील बहुतेक कोचिंग क्लासेसचे इंग्रजी मध्ये असलेले फलक मायबोली मराठी मध्ये करण्याचे आवाहन मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. सेनेच्या पदाधिकारी शाम गोहाड यांच्या नेतृत्वात ज्या कोचिंग क्लासचे इंग्रजी अक्षरात फलक आहेत. त्यांना जाऊन सूचना देण्यात आली आहे. त्यांचाकडून पण ८ दिवसांच्या आत मराठी पाट्या होतील असे आश्वासन देण्यात आले आहे. मराठी फलक लावण्यात आले नाहीतर “मनसे स्टाईल’ आहेच म्हणत इशारा देण्यात आला आहे.
 
भोंग्यांचा वाद पण पुन्हा पेटला होता
 
काही दिवसांपूर्वी नाशिक मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्तांन भेटून शहरातील मस्जिदींवरील भोंग्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. मनसेकडून दिलेल्या या निवेदनात मस्जिदींवरील भोंग्यांचा आवाज बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. हा आवाज बंद झाला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मनसेकडून निवेदनाद्वारे देण्यात आला होता. आणि आता नाशिक मनसे विद्यार्थी सेनेच्या मराठी फलकांवरून ८ दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. एकूणच शहरात मनसे आक्रमक झाली आहे यावरून हे लक्षात येते.
 
कोचिंग क्लास चालक
 
शहरातील कोचिंग क्लास चालकांनी मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांची मागणी मान्य करत लवकरच कोचिंग क्लासचे मराठी फलक करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.