शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (09:31 IST)

गोदावरीला पुन्हा पूर; दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, विसर्ग आणखी वाढणार

godavari
धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. गंगापूर धरणातून ७ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गही वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे गोदाकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू आहे. पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरण पूर विसर्ग गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता ७ हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सध्या सुरू असलेला विसर्ग असा
(आकडे क्युसेक्स मध्ये)
दारणा – ५९२४
मुकणे – ७२६
कडवा – २४९९
वालदेवा – ४०७
गंगापूर – ५११७
आळंदी – ८७
भोजापूर – ५३९
होळकर पूल – ६२९८
नांदूरमध्यमेश्वर – १७ हजार ६८९
पालखेड – ४२६०